About Matchindra Chate
गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन , परिपूर्ण नियोजन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नातूनच उज्वल भविष्याची निर्मिती होऊ शकते. चाटे कोचिंग क्लासेस व चाटे स्कूल यांच्या 36 वर्षाच्या यशस्वी अनुभवातून हजारो पालक व विद्यार्थी यांची स्वप्नपूर्ती करून हे सिद्ध केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाढती स्पर्धा बघता चाटे क्लासेस व चाटे स्कूल ने काळानुरूप बदल घडवून शालेय अभ्यासक्रमासोबत IIT, JEE , NEET , CET , NTSC या सारख्या स्पर्धात्मक परीक्षाची तयारी करून घेवून अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स आणि उच्चपदस्थ अधिकारी घडविले आहेत आणि ही परंपरा अखंडित चालू आहे.

काळाची गरज व इंटरनेट चा वाढता वापर लक्षात घेवून चाटे ग्रुप चे संचालक श्री मच्छिंद्र चाटे सर यांच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा विद्यार्थ्याच्या सर्वागीण विकासासाठी लाभ होण्यासाठी Matchindra Chate Marathi YouTube Channel घेवून आले आहेत.

या चॅनलच्या माध्यमातून शिक्षण विषयक मार्गदर्शन व सरांचे प्रेरणादायी विचार आपल्या पाल्यास दररोज मिळणार आहेत. विद्यार्थी व पालक यांची शैक्षणिक जागरूकता उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्यासाठी सरांचे व्हिडिओ दररोज आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अवश्य पाहा.